तेल आवीव्ह–जाफा
तेल आवीव्ह–जाफा : इझ्राएलची जुनी राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या ३,५७,६०० (१९७४ अंदाज). हे भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील सारन मैदानात, यॉरकोन नदीमुखाच्या दक्षिणेस वसले असून जेरूसलेमच्या वायव्येस ५६ किमी. आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात याची स्थापना झाली.